लातूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा, प्रभारी मुख्याध्यापकाकडून 15 अल्पवयीन मुलींचा विनयभंग

लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. प्रभारी मुख्याध्यापकानेच 15 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी मुख्याध्यापकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील जिल्हा परिषद शाळेत ही खळबळजनक घटना घडली आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून तो मुलींसोबत असभ्य वर्तन करत होता. याबाबत गावकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर प्रभारी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.