
नाबार्डचा ताळेबंद आर्थिक वर्ष 2020-21 साठी 6,57,798 कोटी रुपयांच्या तुलनेत 2021-22 साठी 7,57,246 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. नाबार्डच्या वार्षिक ताळेबंदात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक कामगिरीची घोषणा करताना, नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी.आर. चिंताला यांनी नाबार्डने मुख्यत्वे भू–स्तरीय पत वितरणाला गती देणे, मुख्य आणि सरकारच्या नेतृत्वाखालील उपक्रमांसाठी पुनर्वित्त वितरणाला चालना देणे, एफपीओ फ्रेमवर्कला चालना देणे, अन्न प्रक्रिया, गोदाम आणि कृषी–संचय यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासास मदत करणे, कृषी प्रारंभासाठी निधी देणे, हवामान बदल कमी करणे, तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप वाढवणे, शेतीबाह्य कार्यक्रमांना चालना देणे, ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणुकीद्वारे राज्य प्रकल्पांना समर्थन देणे यावर लक्ष केंद्रित केले.






















































