यूपी व्यावसायिकाच्या घरात सापडले 150 कोटी; टॅक्स धाडीत घबाड उघड, नोटांची मोजणी सुरूच

note-counting

गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल (DGGI) च्या अहमदाबाद टीमने उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका बड्या व्यापारी आणि गुटखा किंग आणि त्याच्या पुरवठादारांच्या ठिकाणांवर छापा टाकला. गेल्या अनेक दिवसांपासून धाडी सुरू आहेत. यादरम्यान व्यावसायिकाशी संबंधित पुरवठादाराच्या घरातून सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

छाप्याच्या छायाचित्रांमध्ये दोन मोठे कपाट नोटांच्या बंडलांनी भरलेले दिसत आहे. नोटांचे बंडल प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून त्यावर पिवळी टेप लावण्यात आली आहे. फोटोमध्ये 30 पेक्षा जास्त बंडल दिसत आहेत.

दुसर्‍या चित्रात आयकर विभाग आणि जीएसटी अधिकारी एका खोलीत चादरीवर बसलेले दिसतात. या चौघांकडे रोख रकमेचा ढीग असून त्यांची मोजणी करण्यासाठी तीन मशीन बसवण्यात आल्या आहेत.

हा पुरवठादार गुटखा व्यापाऱ्याला अत्तर आणि कच्च्या मालाचा पुरवठा करतो. नोटा मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले, अजूनही नोटांची मोजणी सुरू आहे.

जीएसटी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ई-वे बिल तयार न करता बनावट पावत्यांद्वारे माल पाठवला जात होता. या बनावट पावत्या बनावट कंपन्यांच्या नावाने तयार करण्यात आल्या होत्या.

जीएसटी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने चलन तयार करण्यात आले होते. ई-वे बिल टाळण्यासाठी बनावट कंपन्यांच्या नावाने तयार केलेली सर्व चलन 50,000 रुपयांपेक्षा कमी आहेत. कारखान्याच्या बाहेरून असे 4 ट्रकही अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.

व्यापाऱ्याच्या गोदामातून जीएसटी न भरता अशा 200 बनावट पावत्या मिळाल्या आहेत. कारखान्याची पाहणी केली असता कच्च्या मालाचा तुटवडा आढळून आला.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या व्यवसायाशी संबंधित एका पुरवठादाराच्या घरातून सुमारे 150 कोटी रुपयांची मोठी रोकड मिळाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने नोटा मोजण्याची प्रक्रिया सुरू आहे.