दीडशे वर्ष जुना ब्रिटिशकालीन कोयना पूल हलक्या चारचाकी वाहनांसाठी सुरू होणार!

कराड शहराला जोडणाऱ्या दीडशे वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पूलाचे मजबुतीकरण करण्यात आले असून काही दिवसात हलक्या चार चाकी वाहनांसाठी हा पूल सुरु करण्याच्या सूचना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आत्ता पुलावरून दुचाकी वाहने जात आहेत पण काही दिवसानंतर म्हणजे उंचीचे बॅरिकेट टाकल्यानंतर चारचाकी वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात येईल आणि ही वाहतूक जर सुरू झाली तर हायवे वाहतूकीवरील परिणाम काही प्रमाणात कमी होईल.

कोल्हापूर नाका येथील ट्राफिक कमी करण्याकरिता या पुलाचा फायदा होईल आणि सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहतूक या पुलावरून होईल. हा पुलाचे मजबुतीकरण झाल्याने या पुलाचा वापर होईल. राष्ट्रीय महामार्गच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव सुद्धा आहेच. पण त्यासाठी 2 वर्ष लागतील तोपर्यंत कराडकरांच्या वाहतुकीची सोय ही जुन्या कोयना पुलाच्या पुनर्जीवनीकरणामुळे होणार आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या