
शिळ परिसरातील सनराईस ग्लोरी या १६ मजली इमारतीच्या डक्टमध्ये आज सकाळी अचानक आग लागली. त्यामुळे रहिवाशांची पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेत सुमारे ८० रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
शिळ परिसरातील सनराईस ग्लोरी ही तळ अधिक १६ मजली इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या ते सहाव्या मजल्यादरम्यान इलेक्ट्रिक डक्टमध्ये सकाळी आग लागली. आगीमुळे डक्टमधून मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला तातडीने बचावकार्य हाती घेत रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच लिफ्टमध्ये अडकलेल्या फिरोज खान यांचीही सुटका केली.


























































