16 वर्षांच्या मुलीने सुंदर बनण्यासाठी केल्या 100 सर्जरी, आता दिसतेय ‘अशी’

या जगात सुंदर दिसण्यासाठी लोक अनेक दिव्य करतात. अगदी प्राचीन सौंदर्यप्रसाधनांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतात. पण, एका 16 वर्षांच्या मुलीने मात्र या प्रयत्नांचा अतिरेक केला आहे.

सुंदर दिसण्यासाठी या मुलीने चक्क एक दोन नव्हे तर 100 सर्जरी केल्या आहेत. झोउ चुन असं या मुलीचं नाव आहे. चीनमध्ये राहणाऱ्या या मुलीचे आई वडील उद्योगपती आहेत.

झोउच्या म्हणण्यानुसार, या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ती कुरूप दिसत होती. तिचे डोळे खूपच छोटे आणि तुलनेने नाक खूप मोठं होतं. त्यामुळे शाळेत सगळे तिची मस्करी करत. तसंच, तिच्यासोबत ज्या मुली होत्या त्यापैकी सुंदर दिसणाऱ्या मुलींना नेहमी सोपी काम दिली जात असत.

त्यामुळे आपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, असं झोउ सांगते. यानंतर तिने शस्त्रक्रिया करण्याचा सपाटाच लावला. तिने आतापर्यंत कान, नाक, ओठ, ब्रेस्ट ट्रान्सप्लान्ट यांसह अनेक शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत.

zou-china-new-face

त्यासाठी तिने 4 कोटी 51 लाख रुपये खर्च केले आहेत. अर्थात हा खर्च तिच्या आईवडिलांनी केला आहे. इतक्या शस्त्रक्रिया करून ती आता विचित्र दिसायला लागली आहे. मात्र, एवढ्यावरच तिचं समाधान झालेलं नाही. आता तिला बार्बी या प्रसिद्ध बाहुलीसारखं दिसायची इच्छा झाली आहे. त्यामुळे ती स्वतःवर तशी शस्त्रक्रिया करवून घेणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या