
लॉकडाऊनमुळे तुम्ही बँकेची कामे पुढील महिन्यात करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा. कारण ऑगस्ट महिन्यात तब्बल 17 दिवस बँका बंद असणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच तीन दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी जाण्यापूर्वी कोणत्या दिवशी सुट्टी आहे हे माहिती करून घ्या.
महिन्याच्या सुरुवातीला 1 ऑगस्टला मुस्लिम समाजाचा बकरी ईद हा सण असल्याने बँका बंद असणार आहेत, त्याच्या दुसऱ्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस रविवार असून सोमवारी 3 ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे. या दिवशी देशातील बहुतांश भागात बँका बंद असतात. यानंतर 8 ऑगस्टला महिन्यातील दुसरा शनिवार असून 9 ऑगस्टला साप्ताहिक सुट्टी आहे.
11 आणि 12 ऑगस्टला देशातील अनेक भागात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण असून या दिवशी अनेक ठिकाणी बँकांना सुट्टी असते. तर 13 ऑगस्टला ‘पेट्रियोट डे’च्या निमित्ताने इंफाल झोनमध्ये बँका बंद राहतील. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस, तर 16 ऑगस्टला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे सलग दोन दिवस बँक बंद असेल.
20 ऑगस्टला आणि 21 ऑगस्टला हरितालिका तिज निमित्त काही राज्यात बँकांना सुट्टी आहे. तर 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्ताने अनेक राज्यात बँका बंद राहतात. तर 23 ऑगस्टला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे. 29 ऑगस्टला महिन्यातील चौथा शनिवार आणि 30 ऑगस्टला रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.



























































