
इंडिगो एअर लाइन्सच्या स्टाफने आज अचानक संप पुकारल्याने बुधवारी त्यांची संपूर्ण सेवा कोलमडली होती. संपामुळे 200 हून अधिक विमाने रद्द झाली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. तसेच याचा मोठा फटका एअरलाईन्सला देखील बसला आहे.
संपाचा फटका एअरलाईन्सच्या वाहतूकीला तर बसला सोबत इंडिगोचे शेअर्सही पडले. त्यामुळे दोन्ही मिळून विमान कंपनीला एकाच दिवसात एकूण 7160 कोटींचे नुकसान झाले आहे.
इंडिगोच्या केबिन क्रू आणि स्टाफच्या मॅनेजमेंटमध्ये वाद झाला होता. शिफ्ट वाटप आणि डयुटी तासांबाबत मॅनेजमेंट सोबत सुरू असलेल्या वादातून हे आंदोलन पेटले. अनेत विमाने अचानक रद्द करण्यात आली तर काही विमानांनी नियोजित वेळेपेक्षा विलंबाने उड्डाण केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.




























































