अकोला जिल्ह्यात आढळले  कोरोनाचे 18 रुग्ण, दोघांचा मृत्यू

707

अकोला जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 18 रुग्ण आढळले आहेत. अकोल्यात संसर्ग तपासणीचे 232 अहवाल प्राप्त झाले.  त्यातील 214 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान आधीच मृत पावलेल्या एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला. तर आधीपासून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू झाला.

मंगळवारी 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या 279 झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात 115 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

दिवसभरात प्राप्त झालेल्या 232अहवालात 214 अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर 18 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आज प्राप्त झालेल्या पॉझिटीव्ह अहवालांपैकी 11 पुरुष आणि सात महिला आहेत.

मंगळवारी सायंकाळी प्राप्त अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही व्यक्ती चिराणीया कंपाऊंड रामदास पेठ येथील 68 वर्षीय व्यक्ती आहे. ही व्यक्ती 16 मे रोजी दाखल झाली होती. सोमवारी या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला. तर आज उपचार घेतांना आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण  62 वर्षीय व्यक्ती असून सावंतवाडी रणपिसेनगर येथील रहिवासी आहे.

मंगळवारी रात्री आणखी 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व जणांना संस्थागत विलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या