
छत्तीसगडच्या सुकमा जिह्यात 18 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. यापैकी 10 नक्षलवाद्यांनी 38 लाख रुपयांचे एकत्रित इनाम घेऊन आज शस्त्रs खाली टाकली. अमानवी कृत्यातून स्वतःला बाहेर काढत आणि स्थानिक आदिवासींवर अतिरेक्यांनी केलेल्या अत्याचारावरून नक्षलवाद्यांनी निराशा व्यक्त केली, असे सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या दुर्गम गावांमध्ये विकास आणि पुनर्वसन धोरणामुळे नक्षलवादी प्रभावित झाले. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना 50,000 रुपयांची मदत केली जाईल आणि सरकारच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे चव्हाण म्हणाल छत्तीसगड ग्रामीण बँकेने एकेकाळी माओवाद्यांचा गड मानल्या जाणाऱया विजापूर जिह्यातील पामेड या दुर्गम गावात आपली शाखा उघडली आहे.