पाकव्याप्त कश्मीरात 18 दहशतवाद्यांचा खात्मा, हिंदुस्थानी सैन्याची कामगिरी

1149

हिंदुस्थानी सैन्याने पाकव्याप्त कश्मीरात दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. या कारवाईत 18 दहशतवादी ठार झाले होते. हिंदुस्थानी सैन्याने 19-20 ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली होती.

हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे. सैन्यातील एका अधिकार्‍याने ही माहिती दिली की हिंदुस्थानी सैन्याने दहशतवाद्यांचे तीन तळ उध्वस्त केले. या कारवाईत 18 दहशतवादी मारले गेले. तसेच पाकिस्तानचे 16 सैनिकही मारले गेल्याचे वृत्त आहे. या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी जैश ए मोहम्मद  या दहशतवादी संघटनेचे होते.

terrorist-camp

या कारवाईबद्दल माहिती देताना लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले होते की हिंदुस्थानच्या कारवाईत दहशतवादी तळ मोठ्या प्रमाणात उध्वस्त करण्यात आले आहेत. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही माहिती देण्यात आल्याचे रावत यांनी नमूद केले.

नीलम खोर्‍यात चार लॉन्च पॅडवर हल्ला करण्यात आला होता. त्यात जुरा, अथामुक्कम अआणि कुंडलशाही या तळांचा समावेश होता. 20 ऑक्टोबर रोजी हे तळ उध्वस्त करण्यात आले. नियंत्रण रेषेजवळील हे दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले होते. एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की हा दहशतवद्यांसाठी संदेश आहे जो कोणी कश्मीरमध्ये घुसखोरी करेल त्यांची हीच अवस्था केली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या