धाराशिवमध्ये 181 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 644 वर

583
corona-virus-new-lates

धाराशिव जिल्ह्यात सोमवारी 181 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2 हजार 644 झाला आहे. तर 973 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून घरी परतले आहेत. सध्या 1 हजार 604 रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच मागील 24 तासात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णलयातून संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रात संशयीत रुग्णांचे 475 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 469 स्वॅबचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे आला आहे. त्यामध्ये 235 निगेटिव्ह, 125 पॉझिटिव्ह, 105 अहवाल अनिर्णित तर 6 अहवाल प्रलंबित आहेत. तसेच अँटीजेन टेस्टकिटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या टेस्टींगमध्ये 56 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने नव्याने आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 181 झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये धाराशिव तालुक्यात 25, तुळजापूर 24, उमरगा 46, कळंब 96, परंडा 14, लोहारा 15, भूम 38 तर वाशी तालुक्यात 7 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2 हजार 644 झाला आहे. 973 कोरोना रुग्ण उपचारानंतर घरी गेले असून 1 हजार 604 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच मागील 24 तासात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 67 झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या