धाराशिवमध्ये आढळले कोरोनाचे 182 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 3 हजारांच्या वर

522

धाराशिव जिल्ह्यात आज कोरोनाचे 182 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 3 हजार 229 वर पोहोचला आहे. 103 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 1 हजार 507 रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णलयातून संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत संशयीत रुग्णांचे 345 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या पैकी 336 स्वॅबचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. यामध्ये 169 निगेटीव्ह, 113 पॉझिटीव्ह, 54 अहवाल अनिर्णित तर 9 अहवाल प्रलंबीत आहेत. तसेच 1 हजार 76 अँटीजेन किट टेस्टींगमध्ये 69 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आहेत त्यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 182 झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा 3 हजार 229 झाला आहे. 1 हजार 628 कोरोना रुग्ण उपचारानंतर घरी गेले असून 1 हजार 507 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील कोरोना मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 94 झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या