लातूरमध्ये आढळले कोरोनाचे तब्बल 188, रुग्ण 5 रुग्णांचा मृत्यू

1818

लातूर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाचा उद्रेक ऑगस्टमध्ये अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आजच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्येमुळे दिसून आले आहे. लातूर जिल्ह्यात आज तब्बल 188 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वोच्च वाढ ठरली आहे. लातूर जिल्ह्यात उपचारादरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींचे शतक पूर्ण झाले आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये जुलै पासून कोरोनाच्या साथीचा उद्रेक सुरू झालेला आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिला दिवस आजपर्यंतच्या सर्व दिवसाचे रेकॉर्ड मोडणारा ठरला आहे आज तब्बल 188 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. लातूर जिल्ह्यात आज उपचारादरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाला यामुळे जिल्ह्यातील कोरूना ग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या 100 वर पोहोचली आहे. लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या ही 2311 वर पोहचली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 927 असून उपचारामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1284 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या