गुजरातमध्ये भाजप सरकारचे जम्बो मंत्रिमंडळ! 19 नव्या चेहऱ्यांचा समावेश, 3 महिलांना संधी

गुजरातमध्ये भाजपने मुख्यमंत्री भूपेद्र पटेल यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मोठे फेरबदल करत 26 जणांचे जम्बो मंत्रिमंडळ स्थापन केले आहे. गुरुवारी तडकाफडकी 16 मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी 25 मंत्र्यांना शपथ दिली. यामध्ये 19 नव्या चेहऱयांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये 3 महिलांना संधी दिली.

गुजरात मंत्रिमंडळात याआधी मुख्यमंत्र्यांसह 17 मंत्री होते. ज्यात आठ पॅबिनेट मंत्री आणि आठ राज्यमंत्री होते. ही संख्या आता 26 झाली आहे.

हर्ष संघवी उपमुख्यमंत्री

हर्ष संघवी यांना बढती देत उपमुख्यमंत्री बनविण्यात आले आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा हिला मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळातील नवे चेहरे

जितेंद्र वाघानी, नरेश पटेल, अर्जुन मोढवाडिया, प्रद्युम्न वाज, रमण सोलंकी, ईश्वरसिंह पटेल, मनीषा वकील, कांतिलाल अमृतीय, रमेश कटारा, दर्शना वाघेला, काwशिक वेकारिया, प्रवीण कुमार माळी, जयराम गमित, त्रिकम छंगा, कमलेश पटेल, संजयसिंह महिदा, रिवाबा जडेजा, पूनमचंद बरंडा, स्वरूप ठाकोर.