शेतातील बोढीत अडकलेल्या दोन मगरींना वाचवण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crocodile-in-farm

अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपूर

वरोरा तालुक्यातील अकोला-१ येथील शेतकरी गजानन उमरे यांच्या शेतामध्ये गेल्या तीन दिवसांपासून दिसत असलेल्या दोन मगरींना पकडण्यात यश आलं आहे. या APAS या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या हवाली करून चारगाव धरणात सोडून जीवदान दिलं.

या मगरींना कोणत्याही प्रकारे इजा न करता पकडण्यासाठी बोढीतील पाणी उपसण्यात आलं. त्यानंतर बोढीतून त्यांना सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या सुपूर्द करण्यात आलं. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही मगरींना चारगाव येथील धरणात सोडलं आहे.