2023 मध्ये दोन चंद्रग्रहणे, दोन सूर्यग्रहणे! हिंदुस्थानातून दोन चंद्रग्रहणे दिसणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2022 वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण पाहिल्यानंतर लोकांमध्ये ग्रहणांविषयी खूप कुतूहल निर्माण झाले आहे. पुढच्या वर्षी 2023 मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे अशी एकूण 4 ग्रहणे होणार असली तरी त्यापैकी दोन चंद्रग्रहणे तेवढी हिंदुस्थानातून दिसणार आहेत, अशी माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

चंद्रग्रहणे आणि सूर्यग्रहणांविषयी सोमण यांनी सविस्तर माहिती दिली. सोमण म्हणाले, गुरुवार, 20 एप्रिलला होणारे खंडग्रास सूर्यग्रहण आणि शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 ला होणारे पंकणाकृती सूर्यग्रहण हिंदुस्थानातून दिसणार नाही, परंतु शुक्रवार, 5 मे 2023 रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण आणि शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार आहेत. एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱया पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून‘ म्हणतात. पुढच्या वर्षी 2023 मध्ये 1 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला पौर्णिमा येत आहेत. त्यामुळे 31 ऑगस्टला ‘ब्ल्यू मून‘ योग येणार आहे, असेही सोमण यांनी सांगितले.