मुलीवर अत्याचार; नराधमाला 20 वर्षे कारावास, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी खटाव तालुक्यातील गोपूज येथील सागर महेंद्र मोहिते (वय 22, मूळ रा. बनपुरी, ता. पाटण) याला जिल्हा क सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी दोषी ठरवून वीस वर्षे कारावास पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाकली.

गोपूज (ता. खटाव) येथील सागर मोहिते याने 15 ऑक्टोबर 2021 मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक यू. एस. भापकर यांनी केला. त्यांनी पीडितेचे व साक्षीदारांचे जबाब घेऊन आरोपी किरुद्ध जिल्हा न्यायालय, कडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. याकामी सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रघुनाथ डी. खोत यांनी काम पाहिले.

सरकारी पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, कैद्यकीय पुराका क सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपीला दोषी ठरवत वीस वर्षे कारावास 5 हजार रुपये दंड क दंड न भरल्यास सात महिने जादा कैद अशी शिक्षा सुनावली.

याकामी प्रॉसिक्यूशेन स्कॉडचे पोलीस हकालदार जयवंत शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय जाधक, महिला पोलीस हकालदार विजयालक्ष्मी दडस, पोलीस हवालदार आमिर शिकलगार, सागर सजगणे यांनी सहकार्य केले.