दोनशे क्विंटल कांदा चोरला, शेतकऱ्याचे 60 हजारांचे नुकसान

548

शेतकऱयाच्या शेतातून एक-दोन नव्हे तर तब्बल 200 क्विंटल कांद्याची चोरी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावाच्या शिवारात घडली. चोरीला गेलेल्या कांद्याची किंमत सुमारे 60 हजार रुपये एवढी आहे.

साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथील नीलेश बाबूराव पगारे (32) या तरुण शेतकऱ्याने पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार  देशशिरवाडे गावाच्या शिवारात असलेल्या श्रीराम वसंत कोठावदे यांचे शेत आहे. या शेतात कांद्याच्या पिकाची लागवड केली होती. सोमवारी पहाटे चोरट्याने जवळपास 200 क्विंटल कांदा चोरून नेला असून त्याचे बाजारमूल्य 60 हजार इतके आहे.

सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेल्यानंतर शेतात कांदा दिसून आला नाही. त्यामुळे कांद्याची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणी नीलेश पगारे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

आपली प्रतिक्रिया द्या