तर 30 आमदारांचे तिकीट कापणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा इशारा

काही महिन्यांवर गुजरात विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यासाठी भाजपने कंबर कसली असून जय्यत तयारी सुरू केली आहे. 30 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकते असा इशारा खासदार आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी दिला आहे. या आमदारांऐवजी नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाईल असे पाटील म्हणाले.

आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. खासदार चंद्रकांत पाटील हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. तेव्हा पाटील म्हणाले की, पक्षाने नो रीपिट थेअरी लागू केली आहे. त्यानुसार विद्यमान आमदारांऐवजी नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात येईल. त्यामुळे पक्ष 100 जणांना आगामी निवडणूकीत संधी देण्याच्या विचारात आहे. यात विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात विधानासभेच्या 182 जागा असून 70 ठिकाणी भाजपचे आमदार नाहीत. त्यामुळे या 70 जागांसह 30 ठिकाणी नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाईल. म्हणजेच 30 विद्यमान आमदारांवर तिकीट कापले जाण्याची टांगती तलवार असणार आहे. पक्षात कुणीही अस्थायी नाही असेही पाटील म्हणाले. खासदार म्हणून मी सुद्धा पर्मनंट नाही असे पाटील यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या