बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला; कोरोनाबाधितांची संख्या 1600 जवळ

992
corona-virus-new-lates

बीड जिल्ह्यात शनिवारी घेण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या अ‍ॅन्टिजेन चाचणीत 86 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर स्वॅबचा अहवाल रात्री उशिरा आला. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 203 झाली आहे. रविवारी पुन्हा व्यापाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातही दुपारपर्यंत अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये रूग्णांची संख्या वाढली. बीडमध्ये 104, आष्टीत 10, धारूर 2, गेवराई 6, केज 13, माजलगाव 19, परळी 32, पाटोदा 2, वडवणी 5 असे एकुण 203 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर रविवारी दुपारी 62 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1584 वर जावून पोहचला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. रविवारी दुपारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1584 वर पोहचली होती. तर 716 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 818 जणांवर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारपर्यंत घेण्यात आलेल्या अ‍ॅन्टिजन चाचणीमध्ये पुन्हा 64 व्यापारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची वाढत्या संख्येमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या