वसई विरारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 21 वर, तिघांचा मृत्यू

3107

वसई विरार शहरातील करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. सोमवारी रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता, तर शनिवारी एका महिलेचा मृत्यू झाला होता. श्वसनाचा त्रास होत असल्यामूळे  नायर रूग्णालयात  नालासोपारा पेल्हार येथील 38 वर्षीय गरोदर महिलेला दाखल करण्यात आले होते. मृत्यू पश्चात सदर महिलेचे रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आल्यामुळे सोमवार पर्यंत एकूण करोना बाधीत रुग्णांची संख्या 19  झाली होती. त्यात मंगळवारी पुन्हा दोन रूग्णांची वाढ झाल्याने संख्या  21 वर पोहोचली आहे. वसई विरारमध्ये कोरोनामुळे संसर्गाने तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वसई विरार शहरात गेल्या दोन दिवसात रूग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारी त्यात ४ नव्या रुग्णांची भर पडली. रविवारी रात्री 10 वाजता  यातील नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. सदराचा रुग्ण हा मुंबईच्या तारांकित हॉटेलमध्ये कामाला होता. त्याला गेल्या बारा वर्षांपासून डायलसीसचा त्रास होता म्हणून तो उपचारासाठी नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात दाखल झाला होता. सोमवारी दुपारनंतर नालासोपारा पेल्हार येथील 4 एप्रीलला मृत पावलेल्या एका गर्भवती महिलेचा रिपोर्ट आले. त्यात सदर महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. सदर महिलेला एक वर्षाची मुलगी व पतीला पालिकेने आयसोलेट केले आहे. सोमवारी  नव्याने सापडलेल्या  रुग्णांपैकी एक रुग्ण वसईच्या आनंद नगर परिसरातील असून तो पहिल्या मृत पावलेल्या पुरूष रुग्णाचा नातेवाईक आहे. त्याचे वय 67 वर्ष आहे. तर दुसरा रुग्ण नालासोपारा सेन्ट्रल पार्क परिसरात आढळला असून तो सुद्धा मुंबईच्या तारांकित हॉटेल मधील कर्मचारी असून त्याचे वय 57 वर्ष आहे. तर वसई पूर्व परिसरात डी मार्ट जवळ एक 38 वर्षीय महिला करोना बाधित आढळली आहे. ती करोना बाधित रुग्णाच्या सानिध्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील परदेशवारी करून आलेल्या 644 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात 14 दिवस होम क्वारंटाईन झालेल्यांची संख्या 203 आहे. 134 जणांच्या तपासणीनंतर  त्यातील 18 जणांचे रिपोर्ट पॉझीटीव आले आहेत. 125 जण रूग्णालयात उपचार घेत होते त्यांपैकी 101 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 24 रूग्णांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या