बुलढाण्यात 22 नवे रुग्ण; 82 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह

879

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 104 अहवाल मिळाले आहेत. यापैकी 82 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 22 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये आळसणा ता. शेगाव येथील 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगी, 8 वर्षीय मुलगी, 2 वर्षीय मुलगी, 6 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी आणि 30 वर्षीय पुरुष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे आळसणा ता. शेगाव येथे 12 रूग्ण आढळले आहेत.

जामठी धाड ता बुलढाणा येथील 26 व 28 वर्षीय महिला, इंदिरा नगर चिखली येथील 55 वर्षीय महिला, नांदुरा येथील 44 व 41 वर्षीय पुरुष, सुलतानपूर ता. लोणार येथील 35 वर्षीय पुरुष, 6 वर्षाची मुलगी, जळगाव जामोद येथील 57 वर्षीय महिला, टेंभुर्णा ता. खामगाव येथील 20 वर्षीय तरुण आणि मूळ पत्ता बोदवड, जि. जळगाव येथील सध्या मलकापूर येथे असलेली 24 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. तसेच रविवारी 4 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये धामणगाव बढे ता. मोताळा येथील 42 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, डोणगाव ता मेहकर येथील 22 वर्षीय पुरूष आणि मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत 3075 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 176 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 176 आहे. तसेच रविवारी 104 अहवाल आले आहेत. त्यामध्ये 22 पॉझिटिव्ह, तर 82 निगेटिव्ह आहेत. रविवारी 290 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण 300 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 176 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 111 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या