अमरावतीत आढळले कोरोनाचे 225 रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाचे 225 रुग्ण आढलळे आहेत. त्यामुळे जिल्हातील एकूण रुग्णांची संख्या 11 हजाराच्या वर गेली आहे. तसेच आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत रुग्णांमध्ये अचलपूर येथील 75 वर्षीय पुरूष, वरुड येथील 65 वर्षीय महिला व भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील 45 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. यानुसान आतापर्यंत कोरोनामुळे मृतांचीची संख्या 231 वर पोहोचली आहे. दरम्यान आज दुपारपर्यंत कोरोनाचे 225 नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण ग्रामीण व अमरावती शहरातील आहे. त्यानुसार कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार 125 वर पोहोचली आहे. सध्या सुपर स्पेशालिटीमध्ये 1662 रुग्ण दाखल असून 10 रुग्ण नागपूर येथे दाखल आहेत. तसेच गृहविलगीकरणात 678 रुग्ण असून आतापर्यंत 8,389 रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या