तेलंगाणातून मरकजमध्ये गेले होते 1030 लोक, 190 जणांना कोरोनाची लागण

718

देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गहिरे होताना दिसत आहेत. या दरम्यान दिल्लीच्या मरकजमधून परतलेल्या लोकांचा तपास सुरू आहे. तेलंगाणा जिल्ह्यातून मरकजमधून 1030 लोक गेले होते. त्यापैकी 190 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच इतर 500 लोकांची चाचणी झाली असून त्यांचा रिपोर्ट अजून आलेला नाही. राज्यात एकूण 229 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी 82 टक्के रुग्ण हे तबलिगी जमातचे आहेत.

तेलंगाणा राज्यात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. तर 32 जण बरे झाले आहेत. तेलंगाणात शुक्रवारी तब्बल ७५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात ज्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे त्या लोकांना मरजकमधून परतलेल्या लोकांकडून कोरोनचा प्रादुर्भाव झाला होता. गेल्या चार दिवसांत तेलंगाणात 145 रुग्ण आढळले आहेत.

तबलिगी प्रकरणात 960 विदेशी नागरिकांना गृह मंत्रालयाने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. तसेच या सर्व नागरिकांचा विसाही रद्द करण्यात आला आहे. सर्व नागरिक हिंदुस्थानात टूरिस्ट विसावर होते.

आपली प्रतिक्रिया द्या