बीड जिल्ह्यात 237 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; 290 अहवालांची प्रतिक्षा

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रुग्णांचा आकडा वाढत आहे. स्वॅब तपासणीची संख्याही वाढली आहे. सोमवारी 168 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आणि तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्रलंबित असलेले 128 स्वॅबचा अहवाल अद्याप आलेला नाही. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 237 वर पोहचला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 237 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात 96 कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. तर 132 जणांनी कोरोनावर विजय मिळवला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारीही 9 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी दिवसभरामध्ये 168 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रविवारी पाठवलेल्या 128 जणांच्या स्वॅबचे अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. एकूण 237 जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे. सोमवारी पाठवण्यात आलेल्या स्वॅबमध्ये बीडच्या सामान्य रूग्णालयातून 23, कोविड सेंटर बीडमधून 81, आष्टीच्या ग्रामिण रूग्णालयातून 23, माजलगावच्या ग्रामिण रूग्णालयातून 8, गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयातून 13, केजच्या उपजिल्हा रूग्णालयातून 2, कोविड सेंटर अंबाजोगाईतून 11 आणि स्वाराती ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालयातून 7 असे सॅम्पल पाठवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या