कुडाळातील 247 मुले अडकली गोवा राज्यात

589

कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर देशभरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी जी व्यक्ती राज्याची  सीमा बदलेल त्याला 14 दिवस कॉरंटाईन राहावेच लागेल. सद्यस्थितीत कुडाळ तालुक्यातील गोवा राज्यात 247 मुले अडकली आहेत. या लॉकडाऊन काळात गरजवंतांना प्रशासनाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू देण्यात येत असुन दानशूर व्यक्ती, संस्थांनी  अशा व्यक्तींना स्वतंत्र मदत न करता प्रशासनाकडे ती मदत सुपूर्द करावी असे आवाहन कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी केले आहे.

खरमाळे म्हणाल्या की, विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींसाठी मदत करावी या भावनेतून बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी पुढाकार घेतला असुन त्यांनी आपल्याशी चर्चा केली व अशा व्यक्तींना आपल्या कॉलेजमध्ये आवश्यकती व्यवस्था  केली जाईल असे सांगितले आहे. तसेच त्यांच्या कॉलेजमध्ये नर्सींग कर्मचारी उपलब्ध असल्यामुळे आरोग्य सुविधांची चांगली व्यवस्था होईल.  त्या दृष्टीने आम्ही नियोजन केले आहे. सध्या गोवा राज्यातून कुडाळमध्ये 16 मुले दाखल झाली असुन ती विलगीकरण कक्षात ठेवण्यात आली आहेत. त्यांना चांगल्याप्रकारे जेवण, नाष्टा देण्यात आल्याची माहिती यावेळी खरमाळे यांनी  दिली.

यावेळी तहसीलदार रविंद्र नाचणकर म्हणाले की, सध्या कुडाळ तालुक्यात गरजवंतांना देण्यात येत असलेली मदत सर्व गरजवंतांना पोहचावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्याकरिता कुडाळ तहसीलमध्ये स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात आले असुन त्या गरजवंतांना मदत कोणी दिली ती कुणाला, कधी पोहोच केली त्यांची सही घेऊन पारदर्शकपणे काम सुरू असल्याचे सांगितले. कुडाळ तालुक्यातील पणदूर, अणाव, माड्याचीवाडी या आश्रमांना आवश्यक ते धान्य देण्यात आले  आहे. या काळात कुणीही गरजवंत व्यक्ती जीवनावश्यक वस्तुपासून वंचित राहू नये हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. भविष्यात ही परिस्थिती अशीच राहिली तर त्या गरजवंतांना मदत देणे क्रमप्राप्त आहे. तरी दानशुर व्यक्ती व संस्थांनी प्रशासनाच्या आपत्कालिन केंद्राकडे ती मदत सुपूर्द करावी असे  आवाहन त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या