संभाजीनगरमध्ये आढळले कोरोनाचे 25 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1330 वर 

797

संभाजीनगरमध्ये मंगळवारी 25 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1330 एवढी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आज कोरोनाचे 25 रुग्ण आढळले आहेत. त्यात 11 महिला आणि 11 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर रायरी 9 वाजता आणखी 3 बाधित रुग्ण आढळून आले. यात बायजीपुरा 1, राहेमानिया कॉलनी 1, रहीम नगर  येथील 1 जणांचा समावेश आहे. त्यामुळे आज एकूण रुग्णसंख्या 1330 झाली. आतापर्यंत 59 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्यांची संख्या 803 तर उपचार घेणारांची संख्या 468 इतकी आहे. जिल्ह्यात आज आणखी 4 कोरोना बधितांचा मृत्यू झाला. याबरोबर शहरातील कोरोनाबळींची संख्या 59 वर पोहोचली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या