अमरावतीत बिबट्याचा हल्ल्यात 25 बकऱ्यांचा मृत्यू

24

सामना प्रतिनिधी । अमरावती

चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथील गजानन शंकर हेकडे यांच्या घरात काल रात्री 3 च्या सुमारास बिबट्याने शिरुन तेथील गोठ्यात बांधलेल्या 25 बकऱ्यांचा फडशा पाडला.

गेल्या काही दिवसापासून चिखलदरा परिसरात वन्यजीव प्राण्यांनी हैदास माजला आहे, त्यात आजपर्यंत अनेक प्राण्यांचा जीव किंवा मानवहानी सुध्दा झाली आहे. सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई असल्यामुळे जंगलातील वाघ, बिबटसह अन्य प्राण्यांनी गावाकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्याचाच परिणाम म्हणून काल रात्री ३ च्या सुमारास चिखलदरा येथून केवळ १ किमी अंतरावर असलेल्या शहापूर येथील गजानन शंकर हेकडे यांच्या घराच्या परिसरात असलेल्या गोठ्यामध्ये बिबट शिरला. यावेळी बिबट्याने  25  बकऱ्यांचा फडशा पाडला. या घटनेमुळे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे.

चिखलदरा क्षेत्रातील 1 मोठा भाग व्याघ्रप्रकल्पातील जागेकरीता आरक्षित ठेवण्यात आला आहे. यामुळे सुमारे 4 गावांचे पुनर्वसन झाले आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे त्यांचा मानवी वस्तीत देखील दहशत माजली आहे. वनविभागाचा वतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच या घटनेत झालेली नुकसान भरपाई देण्यात येईल असे प्रशासनाने संबंधित शेतकऱ्याला सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या