पाणी बचतीचा संकल्प करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैभव मोहन पाटील

पाणी निर्माण करण्याची ताकत आपल्यात नाही. त्यामुळे त्याचा अपव्यय करण्याचा अधिकारही आपल्याला नाही. जगात सर्वात जास्त पाण्याचा अपव्यय भारतात होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली यांसारख्या शहरांत पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाईनमधून 40 टक्क्यांपर्यंत पाणीगळती होत आहे. मुंबईत दररोज 50 लाख लिटर पाणी केवळ वाहने धुण्यासाठी वापरले जात आहे.

इस्रायलसारख्या राष्ट्रात केवळ 10 सेंमी. पाऊस पडत असतानादेखील तेथील शेतीत इतके धान्य पिकवले जाते की, तेथून धान्याची निर्यात होते. मात्र भारतात 50 सेंमी. पाऊस पडत असूनही येथील जनतेला अन्नासाठी झगडावे लागत आहे. टंचाई क्षेत्रामध्ये भारतीय स्त्राr पाण्यासाठी साधारणत-4 किलोमीटरपर्यंत दररोज पायपीट करते. ब्रश करताना पाच मिनिटे नळ खुला ठेवल्यास 25 ते 30 लिटर पाणी वाया जाते. बाथटबमध्ये अंघोळ केल्यास 100 ते 150 ऐवजी 300 ते 500 लिटर पाणी लागते. पिण्यासाठी मानवाला रोज 3 लिटर तर प्राण्याला 50 लिटर पाणी लागते. जगात 10 पैकी 2 माणसांना पिण्यासाठी शुद्ध पाणी आजही मिळत नाही, हे वास्तव आहे. दूषित पाण्यामुळे दरवर्षी मृत्यू पावलेल्यांची संख्या जगात 22 लाख इतकी आहे. पावसाद्वारे जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आपल्याला कळले पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे. पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ देऊ द्यायची नसेल तर पाणी बचतीचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा.