हे करून पहा – थंडीतला आळस दूर पळवायचाय 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकजण थंडीत तब्येत कमावतात, पण आपल्याला थकवा येतो, झोपावंसं वाटतं. आळस टाळण्यासाठी सकाळी उन्हात बसा.

सकाळी उठल्या-उठल्या तुमच्या दारा-खिडक्यांचे पडदे बाजूला करून सूर्यप्रकाशाला घरात येऊ द्या.

घराच्या गॅलरीत, टेरेसमध्ये, असल्यास लॉनवर सूर्यप्रकाशात वावर वाढवा.

तसेच ऑफिसमध्ये असतानाही लंच ब्रेकमध्ये शक्य झाल्यास उन्हात थोडावेळ तरी थांबा. स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश यामुळे आपोआपच प्रसन्न वाटते.