जालन्यामध्ये कोरोनाचा दुसरा बळी; 25 रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांची संख्या 153 वर

468

जालना शहरातील एका 60 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा जालना जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे. मंगळवारी सकाळी तब्बल 25 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 153 वर पोहचली आहे. तसेच मंगळवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये परतूर तालुक्यातील मापेगाव येथील (8),बदनापूरमधील (2),जालना तालुक्यातील सामानगाव येथील (3),पिरपिंपळगावमधील (1),जाफराबादमधील (1),यावलपिंप्रीतील (1), जालना शहरातील लोधी मोहल्लातील (1),नवीन जालना (1),गांधीनगर (1),व्यंकटेश नगर (1) ,लक्ष्मीनारायणपुरामधील एका रुग्णाचा समावेश आहे. शहरातील मोदीखाना भागातील एका 60 वर्षांच्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. एकूण 73 संशयीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 49 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या