अकोल्यात आढळले कोरोनाचे 26 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1536 वर

अकोल्यात आज कोरोनाचे 26 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1 हजार 536 वर पोहोचली आहे. आज कोरोनाचे 18 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मंगळवारी दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  357 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 331 अहवाल निगेटीव्ह तर 26 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1536 झाली आहे. आज दिवसभरात 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आजअखेर 366 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

18 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात आठ जण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आले. त्यात दोघे सिंधी कॅम्प, दोघे अकोट फैल येथील तर उर्वरित हरिहरपेठ, गुलजारपुरा, जुने शहर व तारफैल येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.तर दहा जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात तिघे सिंधी कॅम्प, दोघे शंकर नगर, दोघे अकोट फैल, बैदपुरा, लाडिज फैल,  गायत्री नगर येथील रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.

366 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत  एकूण 1536 पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील 77 जण (एक आत्महत्या व 76 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 1093 आहे. तर सद्यस्थितीत 366  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या