परभणी जिल्ह्यात 26 रुग्णांची भर; कोरोनामुक्त झाल्याने 20 रुग्णांना डिस्चार्ज

481

परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 26 कोरोना प़झिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात जिल्ह्यातील 24तर परजिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 2 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 431 कोरोनाबाधित आढळले असून 204 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 14 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयातील संक्रमीत कक्षात 213 रुग्ण उपचार घेत आहेत. परभणी तालुक्यातील 35 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून त्या रुग्णास किडनी व मनक्यचा क्षयरोग हा आजार होता. ते पुण्यात नियमितपणे डायलेसीसवर उपचार घेत होते.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातून 20 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने डिस्चार्ज दिला. त्यात परभणी शहरातील जागृती कॉलनीतील 3 तसेच काद्राबाद प्लॉट, सोनारगल्ली गांधीपार्क, जूना पेडगाव रोड, जवाहर कॉलनी, एकनाथ नगर, कडबी मंडई, नाथनगर, नानलपेठ येथील प्रत्येकी एक व्यक्तीचा अशा एकूण 13 रुग्णांचा तसेच पूर्णा शहरातील रेल्वे क्वार्टर, गंगाखेड शहारातील आंबेडकरनगर, नगरेश्वर गल्ली, पाठक गल्लीतील एकूण 5 व सेलू शहरातील फोफसे गल्लीतील एका असे एकूण 5 महिला व 15 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

परभणी शहरातील इक्बाल नगरातील 75 वर्षीय पुरूष, टिपू सुलतान चौकातील 53 वर्षीय महिला, दर्गा रस्त्यावरील 60 वर्षीय पुरूष, विद्यानगरातील 68 वर्षीय पुरूष व सद्गुरू नगरातील 39 वर्षीय पुरूष असे एकूण 5 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. पालम शहरातील अबुबकर कॉलनीतील 26 वर्षीय पुरूष, पूर्णा शहरातील कुरैशी मोहल्लातील 54 वर्षीय पुरूष व सेलू शहरातील विद्यानगर भागातील 58 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली. गंगाखेड शहरातील जैरीपुरा हटकर गल्ली 18, तसेच योगेश्वरी कॉलनी 5, खडकपुरा गल्लीतील 3 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. पालम शहरातील अबुबकर कॉलनीतील व्यक्ती व पूर्णेतील कुरैशी मोहल्लातील व्यक्ती अनुक्रमे संभाजीनगर व नांदेडला पॉझिटिव्ह आढळली आहे.

आतापर्यंत एकूण 3899 संशयित रुग्ण दाखल झाले असून संसर्गजन्य कक्षात 275, विलगीकरण केलेले 599 व विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 3025 एवढे रुग्ण आहेत. एकूण 4164 संशयितांचे स्वॅब घेतले असून त्यातील 3514 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर 431 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 125 स्वॅब अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीस आयोग्य ठरले आहेत. 42 स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या