
कोल्हापूरातून आतापर्यंत 20 रेल्वेमधून 27 हजार 377 मजूर मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील त्यांच्या मूळ गावी रवाना झाले आहेत. जिल्ह्यातील एक हजार 401 मजुरांना घेऊन गुरुवारी दुपारी 1 वाजता बिहारमधील अरारियाकडे विशेष रेल्वे रवाना झाली. आताअखेर जिल्ह्यातील एकूण 27 हजार 377 मजूर रवाना झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 13 हजार 552 उत्तरप्रदेशातील आहेत. तर बिहारकडे 9 हजार 822, मध्यप्रदेशकडे 1066, झारखंडकडे 1460 आणि राजस्थानकडे 1477 मजूर रवाना झाले आहेत.























































