देशभरात 24 तासात 28, 637 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या साडेआठ लाखांजवळ

530

जगासह देशभरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. देशभरात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण गेल्या 24 तासात आढळले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने दिलासा मिळाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत देशभरात 28 हजार 637 नवे आढळले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी ही सर्वाधिक संख्या आहे. तर 24 तासात 551 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 लाख 49 हजार 553 एवढी झाली आहे. 5 लाख 34 हजार 621 रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर 2 लाख 92 हजार 258 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात 551 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 22 हजार 674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.78 टक्क्यांवर पोहचले आहे. देशात महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होत असून या राज्यात जास्त रुग्ण सापडत आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असूनही देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी 25 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांपर्यंत पोहचण्यासाठी 110 दिवस लागले होते. तर एक लाखांपासून आठ लाखांपर्यंत रुग्णसंख्या पोहचण्यासाठी 53 दिवस लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या