देशभरात गेल्या 24 तासात 28 हजार 701 नवे कोरोना रुग्ण; 500 रुग्णांचा मृत्यू

470

देशभरात गेल्या 24 तासात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 28 हजार 701 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 78 हजार 254 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात सलग दुसऱ्या दिवशी 28 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर चार दिवसांपासून 25 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात 3 लाख 1 हजार 609 अॅक्टिव्ह रुग्ण असून 5 लाख 53 हजार 471 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 23 हजार 174 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या