अमरावतीत 29 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 779 वर

373
corona-new

अमरावतीमध्ये गुरुवारी दुपारपर्यंत आलेल्या अहवालात 29 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 779 झाली आहे. यापूर्वी कोरोनाबाधित रुग्ण अमरावती शहरातच आढळत होते. आता मात्र त्याचे संक्रमण संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. मेळघाटात चिखलदरा व धारणी तालुक्यात याचा फैलाव झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी सकाळी 10 वाजता आलेल्या अहवालानुसार 4 रुग्ण वलगाव क्वॉरंटाईन सेंटरचे आहेत. यात 36 वर्षीय महिला तर 65 वर्षीय पुरुष, 23 वर्ष व बेलपुरा येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दुपारी दोन वाजता आलेल्या दुसर्‍या अहवालात अशोकनगरचे एकूण 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात 28, 27 वर्षांचे पुरुष आणि 14 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. यासोबतच अचलपूर तालुक्यातील 24 वर्षीय पुरुष, टोपेनगर येथील 65 वर्षीय पुरुष, सिद्धार्थ नगर येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणार्‍या 36 वर्षीय महिलेलाही कोरोना झाला आहे. चांदुर रेल्वे येथील 26, 44 वर्षांच्या पुरुषाचा तर 62 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. तपोवन येथे 44 वर्षीय महिला व परांजपे कॉलनी येथील 57 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे. यासोबतच हनुमान नगर 62 वर्षांच्या पुरुष, 48 वर्षांची सिद्धार्थ नगर येथील महिला, चौरे नगर येथील 11 वर्षांची मुलगी , 65 वर्षांचा पुरुष अंबिकानगर, वृंदावन कॉलनीतील 61 व 38 वर्षांच्याय महिला कोरोनाबाधित आढळल्या आहेत. अंबागेट येथील 40 वर्षांचा तर अशोक नगर येथील 25 व 12 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. गेल्या काही दिवसात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर शहरी भागात गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या