Video : सेल्फीच्या नादात तरुणी 100 फूट खोल दरीत कोसळली, ट्रेकर्सनी वाचवले प्राण

साताऱ्यात सेल्फीच्या नादात एक तरुणी 100 फूट दरीत कोसळली होती. तेव्हा स्थानिक ट्रेकर्संनी रशीच्या सहाय्याने या तरुणीचा जीव वाचवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खटाव तालुक्यातल्या मायणी गावातून रुपाली देशमुख ही 29 वर्षीय तरुणी मित्र मैत्रिणींसोबत सज्जनगड आणि ठोसेघर धबधबा फिरायला आली होती. तेव्हा बोरणे घाटावर ती सेल्फी काढत होती. सेल्फी काढताना तिचा तोल गेला आणि 100 फूट खाली दरीत कोसळली.

रुपाली खाली कोसळल्यानंतर तिच्या मित्र मैत्रिणींनी आरडा ओरड केली आणि स्थानिकांना मदतीसाठी बोलावले. स्थानिक ट्रेकर्संनी घटनास्थळी धाव घेतली. होमगार्ड अविनाश मांडे यांनी रशीच्या सहाय्याने खाली गेले आणि जिवाची बाजी लावत रुपालीचे प्राण वाचवले.

जखमी रुपालीला जवळच्या रुग्णायलयात दाखल केले. रुपाली या अपघातात जखमी झाली होती. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले असून तिची प्रकृती ठीक असल्याचे म्हटले आहे.