मुंबईत 12 तासांत पडला 293 मिमी पाऊस, 22 वर्षांचा तुटला रेकॉर्ड

1274

बुधवारी मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईत 12 तासांत रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे. या पावसाने 22 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. मुंबईत बुधवारी सकाळी 8.30 ते रात्री 8.30 दरम्यान 293.8 मीमी पाऊस पडल आहे.

कुलाबा वेधशाळेनुसार दक्षिण मुंबईत 12 तासांत 293.88 मीमी पाऊस पडला. 22 वर्षांपूर्वी 1998 साली 10 ऑगस्ट रोजी 261.9 मीमी पावसाची नोंद झाली होती. कुलाबा क्षेत्रात 70 ते 80 किमी प्रतितास वारे वाहत होते. नंतर सायंकाही 5.30 नंतर वार्‍याचा वेग 107 किमी प्रतितासांवर पोहोचला होता. एका वादळात वाहणार्‍यांची वार्‍यांचा वेग हा 92 किमी प्रतितास असतो. म्हणजेच मुंबईत वादळी वार्‍यांपेक्षाही जोरात वारे वाहत होते.

मुंबईत 1 जून ते 5 ऑगस्ट दरम्यान 2366 मीमी पाऊस झाला आहे. सांताक्रुझ हवामान विभागाने 2356 मीमी पावसाची नोंद केली आहे. तर गेल्या 59 तासात मुंबईत 456 मीमी पावसाची नोंद झाली आहे.ऑगस्टमध्ये जेवढा पाऊस पडतो त्यापैकी 64 टक्के अधिक पाऊस गेल्या पाच दिवसांत झाला आहे.

बुधवारी पावसाचा जोर इतका जास्त झाला आहे की शासकीय-खासगी कार्यालयांना कालपासूनच सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्ता खचने, शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. चर्चगेटकरून सीएसटीला येणार्‍या मार्गावर मुंबई जिमखानाजवळ अनेक बस गाड्यांकर झाडे उन्मळून पडली. दुपारी 1 वाजून 19 मिनिटांनी समुद्रालाही उधाण आले. त्यामुळे प्रचंड उंचीच्या लाटा उसळल्या. शिवाय याच वेळी अतिवृष्टी झाल्याने हिंदमाता, किंग्ज सर्कल, बीपीटी स्कायवॉक, गांधी मार्केट, शेख मिस्त्री दर्गा रोड, शीव रोड, पोस्टल कॉलनी चेंबूर, अंधेरी सबवे, अंधेरी मार्केट, दहिसर सबवे अशा अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले. जोरदार पाऊस आणि पाणी साचल्याने ‘बेस्ट’च्या काही मार्गावरील वाहतूकही वळवावी लागली.

123 ठिकाणी झाडे कोसळली, 24 शॉर्टसर्किट

जोरदार वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शहरात 35, पूर्व उपनगरात 21 तर पश्चिम उपनगरात 65 अशा 123 ठिकाणी झाडे-झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. याबाबत आपत्कालीन विभागाकडे आलेल्या तक्रारींनंतर पालिकेच्या माध्यमातून तातडीने कार्यकाही करण्यात आली. दरम्यान, शहरात 15, पूर्व उपनगरात 1 तर पश्चिम उपनगरात 8 अशा 24 ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या