नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेतून तीन अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता

475

लातूर येथील औद्योगिक वसाहतीमधील नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेतून तीन अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक जयपालसिंग किशनसिंग जमादार यांनी औद्योगीक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसतीगृहातील मुलांना 19 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी भोजन कक्षात सोडण्यात आले होते. त्यानंतर अभ्यासासाठी अभ्यास वर्गामध्ये मुलांना बसवण्यात आले. अभ्यासवर्गाचे शिक्षक सुजीत कृष्णा धस यांनी मुख्याध्यापकांना सांगितले की, अभ्यासवर्गात 3 मुले आलेली नाहीत. त्यामध्ये आनंद सोमनाथ ढगे, प्रशांत महिपती कांबळे, अदित्य परमेश्वर उपाडे यांचा समावेश आहे. वसतीगृहात, शाळेत तसेच परिसरात सर्वत्र त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ती मुले सापडली नाहीत. त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, ती मुले घरीही गेली नव्हती. त्यानंतर पोलीस ठाण्यात 3 मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही मुले स्वतः पळून गेली की, त्यांना कोणी पळवले याची चर्चा होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या