जालना जिल्ह्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू; कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 45 वर

413

जालना जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात मंगळवारी 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून 37 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जालना शहरातील नुतनवसाहत भागातील 45 वर्षीय पुरुष रुग्णाला श्वसनाचा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना 8 जुलै रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना 10 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच 13 जुलै रोजी रात्री 11 वाजता त्यांचा मृत्यू झाला. तर जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथील रहिवाशी असलेल्या 55 वर्षीय महिला रुग्णाला श्वसनाचा, फुफ्फुसांचा जुना आजार व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना 3 जुलै रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना 10 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच 13 जुलै रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. तर तिसरा शहरातील पेन्शनपुरा भागातील 65 वर्षीय पुरुष रुग्णाला श्वसनाचा, मधुमेह, उच्च रक्तदाब व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना 10 जुलै रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना 12 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच 13 जुलै रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. तर जिल्ह्यात मंगळवारी 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या