लातूर जिल्ह्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू; कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या 37 वर

1042

लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 37 वर पोहचली आहे.

उदगीर येथील सामान्य रुग्णालयात 65 वर्षीय महिलेवर कोरोनाचे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या 48 वर्षांच्या व्यक्तीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मुलांची शासकीय शाळा औसा येथे एका 72 वर्षीय व्यक्तीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी पुन्हा जिल्ह्यात तिघांचे मृत्यू झाल्याने लातूरकरांची चिंता वाढली आहे. वाढत जाणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून जिल्ह्यात 30 जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या