
दक्षिण कश्मीरमधील अमरनाथ गुहेत बाबा भोलेनाथला नमन करणाऱया यात्रेकरूंच्या संख्येने रविवारी तीन लाखांचा आकडा ओलांडला. आज सुमारे 15,000 यात्रेकरूंनी या गुहेत नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. दर्शन घेणाऱया एकूण यात्रेकरूंची संख्या आता 3,09,957 वर पोहोचली आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले. 52 दिवस चालणाऱया या यात्रेची 19 ऑगस्टला सांगता होणार आहे.