विधानपरिषद निवडणुकीत तीन आमदार 21 कोटी रुपयांत फुटले, अमोल मिटकरी यांचा दावा

विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार 21 कोटी रुपयांमध्ये फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. प्रत्येक आमदाराला 7 कोटी रुपये दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर विकली तर 20 लाख रुपये येतील. मात्र, इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात. उमेदवारासाठी जो घोडेबाजार सुरु आहे तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांनी गटनेते पदाची ऑफर दिली आहे. या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊ, अशी ऑफर दिल्याचेही मिटकरी म्हणाले.