बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संतप्त नागरिकांनी रेल रोको केला. यामुळे अंबरनाथ ते खोपोली दरम्यान 30 लोकल गाडय़ा रद्द करण्यात आल्या. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस कल्याणवरून वळवली. 10 मेल एक्स्प्रेस गाडय़ा कर्जत-पनवेल-ठाणे स्थानकावरून वळवण्यात आल्या तसेच अंबरनाथ ते कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली.
या जनआंदोलनाचा परिणाम मुंबईच्या रेल्वेसेवेवर देखील झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अंबरनाथ आणि कसारा या दरम्यान सेवा सुरू होती. परंतु, पुढे जाणारे प्रवासी प्लॅटफॉर्मवरच अडकले. मध्य रेल्वे 30 ते 35 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.