
नायजेरियाच्या नायजर राज्यातील सेंट मेरी स्कूलवर काही बंदूकधारींनी हल्ला करून ३०३ मुले आणि १२ शिक्षकांचे अपहरण केले, असे वृत्त ख्रिश्चन असोसिएशन ऑफ नायजेरियाने शनिवारी दिले. अद्याप कोणत्याही गटाने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. चार दिवसांपूर्वी केब्बी राज्यातील मागा शहरातही २५ शाळकरी मुलांचे असेच अपहरण करण्यात आले होते. नायजेरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नोआ रिबाडू अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना हा हल्ला झाला.
सेंट मेरी कॅथोलिक प्रायमरी आणि सेकंडरी शाळा ही को-एज्युकेशनल संस्था असून, ती नायजर राज्यातील दुर्गम पापिरी परिसरात आहे. हल्लेखोरांनी शाळेच्या डोमेटरींमध्ये घुसून विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि जंगलाकडे नेले. CAN नुसार, हे अपहरण ‘बॅंडिट्स’ने (सशस्त्र गुन्हेगारी गँग) केले असावे, जे पैसे मागण्यासाठी अपहरण करतात. अद्याप कोणत्याही गटाने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.































































