संभाजीनगरमध्ये आढळले कोरोनाचे 308 रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू

826

संभाजीनगरमध्ये आज कोरोनाचे तब्बल 308 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 7 हजार 464 वर पोहोचली आहे. संभाजीनगरमधील  मनपा हद्दीतील 189 तर ग्रामीण भागातील 119 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7646 कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी 4033 रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच आतापर्यंत 335 रुग्णांचा मृत्यू झला आहे.

घाटीत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

बुधवारी घाटीत 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात  आतापर्यंत 262 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 254 जिल्ह्यात वास्तव्यास होते. आतापर्यंत घाटीत 254, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 79, जिल्हा सामान्य रुग्णालयात 2 अशा  एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या