विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे 32 समन्वयक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विधानसभा निवडणुकीसाठी विभागवार 32 समन्वयक आणि सात मुख्य समन्वयकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती विधानसभा निवडणुकीच्या कालावधीकरिता असेल, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्र व पुणे – मुख्य समन्वयक – रवींद्र मिर्लेकर (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व पुणे जिल्हा), समन्वयक – सुरेश राणे (चोपडा, जळगाव शहर), राजू पाटील (नांदगाव, निफाड), केसरीनाथ पाटील (कोथरुड, खेड आळंदी), पाटील सुनील (पाचोरा, चाळीसगाव), सुनील पाटील (मालेगाव बाह्य, धुळे शहर), स्वप्नील पुंजीर (नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली).

मराठवाडा- मुख्य समन्वयक – विश्वनाथ नेरुरकर (छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशीव, सोलापूर, माढा, नगर), समन्वयक – सुहास सामंत (धाराशीव, परांडा), महेंद्र इंदुलकर (उमरगा, औसा), प्रसाद सामंत (छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, वैजापूर), दीपक शेडे (कळमनुरी, हिंगोली), सुनील धांडे (गेवराई), जगदीश चौधरी (नेवासा, श्रीगोंदा), उद्धव कुमठेकर (बार्शी, सोलापूर दक्षिण, सांगोले), डॉ. लक्षराज सानप (परभणी, गंगाखेड, परतुर), प्रदीप खोपडे (पैठण, सिल्लोड, कन्नड).

पश्चिम महाराष्ट्र – मुख्य समन्वयक – दगडू सकपाळ (सातारा, सांगली, कोल्हापूर), समन्वयक – महेश लाड (राधानगरी, शाहुवाडी), सचिन चऱहाटे (सातारा, पाटण), संतोष सरोदे (मिरज).
पूर्व विदर्भ -मुख्य समन्वयक – प्रकाश वाघ (नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली – चिमूर), समन्वयक – नरेश बुरघाटे (रामटेक).

पश्चिम विदर्भ – मुख्य समन्वयक – अरविंद नेरकर (बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ – वाशीम, वर्धा), समन्वयक – शैलेंद्र चिखलकर (बडनेरा, दर्यापूर), अनुप गावड (बाळापूर, अकोला पूर्व), राजेंद्र विश्राम रावराणे (बुलढाणा, मेहकर), भोला राठोड (वणी, वाशीम).

कोकण – मुख्य समन्वयक – प्रदीप बोरकर (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), समन्वयक – राजू राऊत (सावंतवाडी, कुडाळ, कणकवली), दशरथ गांधी (राजापूर, रत्नागिरी), विठ्ठल शेळके (दापोली, गुहागर),
मुख्य समन्वयक – विजय कदम (ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड, मावळ (विधानसभा – पनवेल, कर्जत, उरण), समन्वयक – शशिकांत मोरे (भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम), संतोष जाधव (अंबरनाथ, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण), संदीप मोरे (ठाणे शहर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ऐरोली), शीतल देवरुखकर-शेठ (पालघर, बोईसर), अखिलेश कटुकाळे (महाड, पेण, अलिबाग), संदीप भालेकर (पनवेल, कर्जत, उरण).