अकोल्यात आढळले कोरोनाचे 32 रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू

768

अकोला जिल्ह्यात आज कोरोनाचे 32 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 1073 वर पोहोचली आहे. दरम्यान आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर सायंकाळी 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोन जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर  उर्वरित 16 जणांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात 341 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी  दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण 7548 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 7232, फेरतपासणीचे 130 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 186 नमुने होते. आजपर्यंत एकूण 7540 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 6467 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 1073 आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

341 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत 1073 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या 676 आहे. तर सद्यस्थितीत 341 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या